दैनिक स्थैर्य | दि. ८ डिसेंबर २०२३ | फलटण |
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांची शाळा, शिवाजीनगर, फलटण येथे सकाळी ११.०० वाजता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
महात्मा शिक्षण संस्था मतिमंद मुलांची शाळा अध्यक्ष श्री. संदिप चोरमले यांनी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली आणि संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ठाकुरकी येथे जागा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तेथे १८ वर्षाच्या वरील प्रौढ विद्यार्थ्यांसाठी नविन इमारत बांधणार असून तेथे कार्यशाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळेला नेहमी मदत करणार्या दानशूर व्यक्तींचे त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. ला. प्राध्यापक सौ. निलम देशमुख यांनी मुलांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि या मुलांसाठी लायन्स गोल्डन ग्रुप फलटणच्या वतीने भरीव मदत करणार असल्याचे सांगितले. मुलांची दैनंदिन माहिती जाणून घेतली. तज्ज्ञ डॉ. शशिकांत जाधव यांनी फिजिओथेरपी विषयी पालकांना सविस्तर माहिती सांगितली आणि डॉ. स्नेहल गाढवे यांनी मुलांची दंत तपासणी करून सविस्तर मार्गदर्शन करून त्याचे महत्त्व पालकांना आणि विदयार्थ्यांना समजून सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ला. सौ. संध्या गायकवाड सचिव, लायन्स गोल्डन ग्रुप फलटण यांनी शाळेचे, विदयार्थ्यांचे विशेष कौतुक केले आणि महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांची शाळा अध्यक्ष संदीप चोरमले आणि त्यांच्या पत्नी सचिव सौ. स्वातीताई चोरमले आपण खूप चांगले काम करत आहात, असेही त्या म्हणाल्या.
मा. ला. सौ उज्ज्वला निंबाळकर चार्टर्ड अध्यक्षा लायन्स गोल्डन ग्रुप फलटण, मा. ला. सुनंदा भोसले माजी अध्यक्षा लायन्स गोल्डन ग्रुप फलटण, मा. ला. सौ. सुनिता कदम माजी अध्यक्षा लायन्स गोल्डन ग्रुप फलटण ह्या यावेळी उपस्थित होत्या. तसेच लायन्स गोल्डन ग्रुप फलटणचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. प्रियंका पवार याही उपस्थित होत्या. तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी श्री. सुभाष मुळीक, श्री. महेश जगताप आणि श्री. सागर गावडे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश लालसरे सर यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमित राऊत सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शाळेचे विशेष शिक्षिका सौ. गिरना पवार, सौ. सुनिता गायकवाड, राधिका माळवे, वंदना धारशिवकर, अमोल राऊत, पूजा कडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी पालक व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुलांना आणि पालकांना अल्पोपहार देणेत आला. यावेळी मुलांचा आनंद पाहून उपस्थित पाहुणे भारावून गेले होते. हा दिव्यांग दिन अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला.