दैनिक स्थैर्य । दि. २० फेब्रुवारी २०२२ । पंढरपूर । पंढरपूर प्रतिनिधी- चंद्रभागा नदी वरील महाव्दार घाटावरील दुर्बल, वंचित, अंध, अंपग, शोषित, भिक्षेकरी यांना सोबत घेऊन महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागा नदी पात्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा महाव्दार घाटावरील दुर्बल, वंचित, अंध, अंपग, शोषित, भिक्षेकरी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी या वंचित, दुर्बल घटकातील लोकांना सोबत घेऊन शिवजयंती करण्याचा निर्धार केला होता.
या दुर्बल घटकातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना शिवभोजन हे मोफत मिळाले पाहिजे, त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली पाहिजे या दुर्बल घटकातील लोकांनकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.
जर आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर ही वेळ या लोकांवर आली नसती. त्यांना छत्रपतींनी न्याय दिला असता त्यांना उपासमारीची वेळ असी नसती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना न्याय दिला असता असही यावेळी गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे.
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निवडणूका लढवतात पण त्यांचा आदर्श ही राजकारणी मंडळी घेत नाहीत. अश्या दुर्बल घटकातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही या लोकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी समाजसेवक राहुल परचंडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, महर्षी वाल्मिकी संघ पंढरपूर शहर अध्यक्ष सुरज कांबळे, प्रताप अधटराव, महर्षी वाल्मिकी संघ मंगळवेढा शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी, वैभव कांबळे, दत्तात्रय देशमाने, रवी नाईकवाडी, गणेश तारापूरकर, अभय अंकुशराव, राहुल पुजारी, गणेश कांबळे, बाबासाहेब नेहतराव, आदी उपस्थित होते.