
दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । सातारा । जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यावतीने तसेच जिल्हा रुग्णालय, सातारा , इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन, आर्ट ऑफ लिव्हींग, पतंजली योग , हॅप्पी लाईफ फाँडेशन, सातारा, गाथा योग साधना केंद्र,योग विद्याधाम, सातारा ,गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगर स्थान सातारा यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन श्रींमत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी ,जि.प. डॉ. राधाकिसन पवार व अतिरिक्त जिल्हा शल्य् चिकित्सक डॉ. सुभाष कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले. तसेच आंतरराष्टीय योग दिनाच्या कार्याक्रमामध्ये विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध योग संस्थांचे पदाधिकारी , सदस्य यांनी ऑनलाईन पध्दतीने सहभागी घेतला.