
दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । सातारा । गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा उत्साह सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी उत्साहात व आनंदीय वातावरणात तसेच शांततेत साजरा करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
श्री. देसाई म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी विविध परवान्यांची आवश्यकता असते यासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. याद्वारे गणेश मंडळाना तात्काळ परवानग्या मिळत आहेत. गणेशोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारींनी आपापल्या हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळाची बैठका घेऊन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करुन जिल्हा प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. देसाई यांनी केले आहे.