ब्रिस्बेनमधील कसाेटीचे आयाेजन अडचणीत; तीन दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर


स्थैर्य, दि.९: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटी आयाेजनाबाबतच्या अडचणी आता दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच या कसाेटीचे आयाेजन अनिश्चित मानले जात आहे. येत्या १५ जानेवारीपासून चाैथ्या कसाेटीला सुरुवात हाेईल. मात्र, याचदरम्यान या ठिकाणी तीन दिवसांच्या लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आली. त्यामुळे या कसाेटीच्या आयाेजनामध्ये माेठा अडसर निर्माण झाला. या ठिकाणी असलेल्या एका हाॅटेलमध्ये आयसाेलेशन केंद्रातील एक कर्मचारी हा काेराेनाबाधित असल्याचे समाेर आले. यातूनच या कसाेटी सामन्याच्या आयाेजनाला माेठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यादरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बीसीसीआयचे समर्थन केले आहे.

ब्रिस्बेन येथील कसाेटीच्या आयाेजनाला परवानगी देताना स्थानिक प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली. यामुळेच सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि टीम इंडियाचे खेळाडू प्रचंड नाराज आहे.

या नियमावलीमध्ये काेणत्याही प्रकारची सूट देणार नसल्याचेही गत दाेन दिवसांपूर्वी स्थानिक आराेग्यमंत्री राॅस बेट्स यांनी ठणकावून सांगितले हाेते. आराेग्यमंत्र्यांच्या याच भूमिकेवर बीसीसीआयने प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि चाैथी कसाेटीही सिडनीमध्येच आयाेजित करण्याचे साकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला घातले.


Back to top button
Don`t copy text!