बालविवाहप्रकरणी चौघांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । सातारा । वाठारस्टेशन, ता. कोरेगाव येथे एका 15 वर्षीय मुलीचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करून तिला मारहाण, शिवीगाळ करून जबरदस्तीनी सासरी पाठवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून इंदुबाई शामराव कांबळे, संतोष शामराव कांबळे, रंजना संतोष कांबळे (सर्व रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) व ॠषीकांत शेखर डोईफोडे (रा. बोरी-खेड, ता. खंडाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि. 18 रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास सर्वांनी पीडित मुलीचा बालविवाह करून देऊन पतीसोबत सासरी जाण्याकरिता व तिने विवाह केल्याचे कोणाला सांगू नये याकरिता तिला दमदाटी, शिवीगाळ करून मारहाण केली. तपास हवालदार गुरव करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!