दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । सोनवडी । सातारा शहराच्या दिशेने निघालेल्या चारचाकी कारला यवतेश्वर घाटात आपघात झाला असून गाडी तिनशे ते चारशे फुट दरीत कोसळली आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुपारी साडेतिन वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटातून सातारा शहराच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना चारचाकी वाहन महादरे तळेच्या दिशेला दोनशे फुट दरीत कोसळले. या वाहनात सात प्रवासी असल्याची माहिती समोर आली असून त्यातील दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मदत कार्यात स्थानिक नागरीक, वाहन चालक, पोलीस, ट्रेकर्स यांनी मदत कार्य राबवून जखमीना उपचारासाठी रूग्णांलयात दाखल केल्याची माहीती समोर आली आहे.