दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
श्रीमंत जयश्रीमालादेवी नाईक निंबाळकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडी, फलटण (एम.बी.ए.) कॉलेज (ढोर गल्ली, मलटण स्माशानभूमी शेजारी, ता. फलटण) येथून दि. १६ सप्टेंबरच्या रात्री सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची पांढर्या रंगाची महेंद्रा बोलेरो मालवाहू पिकअप चोरीला गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलिसात दाखल झाली आहे. या बोलरो पिकअप गाडीचा क्र. एमएच१२एलटी०४५५ आहे.