सातार्‍यात रविवारी करिअर मार्गदर्शन शिबिर


स्थैर्य, 14 जानेवारी, सातारा – मराठा बिझनेसमेन फोरम संचलित शिवनेरी कॅडमी यांच्या वतीने रविवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजता रोजी शाहू कलामंदिर सातारा येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. भारतीय सशस्त्र दलात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवण्याच्या संधी आणि प्रक्रियेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती मराठा बिझनेसमेन फोरमचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, सचिव किरण पाटील. उपाध्यक्ष जगदीश शिर्के यांनी दिली.

श्रीधर कंग्राळकर म्हणाले, “या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून (निवृत्त) मेजर जनरल (डॉ.) विजय पी. पवार आणि (निवृत्त) ब्रिगेडियर प्रवीण पी. शिंदे उपस्थित राहणार आहेत. ते विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथील मुलांसाठीच्या आणि नाशिक येथील मुलींसाठीच्या सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमध्ये (एसपीआय) प्रवेश कसा मिळवावा, याबद्दल सविस्तर माहिती देतील, तसेच पुणे येथील नॅशनल डिफेन्स कॅडमीमध्ये (एनडीए) अधिकारी म्हणून प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रता आणि तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन करतील. सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा बिझनेस फोरमच्या वतीने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!