मोबाईलच्या जमान्यात मुलांच्या हाती कॅमेराची क्लिक


स्थैर्य, कातरखटाव, दि. २९ : करोना महामारी नंतर लॉक डाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. अशावेळी मोठ्या लोकांना त्याची जाणीव झाली होती मात्र लहान मुलांना त्याचा अर्थ कळत नव्हता. अशावेळी चिमुकलयांच्या  हाती मोबाईल ऐवजी कॅमेरा देत पालकांनी त्यांना  व्यवसायचे धडे गिरवण्यास दिले.

खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या  वडूज येथील  निहान आयाज मुल्ला या चार वर्षाच्या मुलीने वडिलांना व्यवसायात हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.  बसस्थानका समोर पत्रकार आयाज मुल्ला यांचा फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडियो मध्ये सध्या ही चार वर्षीय बालिका कॅमेरा गळ्यात अडकवून इतरांचे फोटो सेशन करत आहे. सर्व क्षेत्रात महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. फोटोग्राफी मध्ये रुनिका कंदारी, हसीन जम्मू, पामेला बोल्डस, संजूकता बासू, नैना रज्जू,  अनुष्का मेनन अशी बरीच मोठी यादी आहे. 

जगातील राज घराणे ते सिने सृष्टीतील अभीनेत्यांनी फोटोग्राफी करणाऱ्या महिलांपैकी पामेला बोडर्स  यांनी मिस ‘किताब सुद्धा जिंकला आहे.  आज महिलांना फोटोग्राफी चे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. सध्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिला फोटो ग्राफर यांनी आपले चांगले नाव कमावले आहे.  वडूज येथील  प्रख्यात  फोटोग्राफर एम दिलावर यांची नात सध्या फोटोग्राफी चे धडे शिकत आहे. तिचे वडील आयाज मुल्ला हे पत्रकार म्हणून कार्यरत असून आपल्या मुलीला प्रोत्साहित करण्यासाठी तिच्या हाती कॅमेरा देत असतात. या चिमुकलीच्या नजरेतून काढलेले फोटो हे ख्यातनाम फोटोग्राफर ला सुद्धा लाजवेल असे आहेत. भविष्यात तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात संधी मिळेलच परंतु त्यांनी फोटोग्राफी मध्ये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे दिसून येते. सध्या या लहान मुलीच्या फोटोचा छंद जोपण्यासाठी अनेक जण या बलिकेच्या नजरेतूनच फोटो काढत आहेत.  

चिमुकलीच्या कॅमेऱ्यातून  आकाश यादव यांचा  फोटो (छाया : समीर तांबोळी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!