मराठी भाषा दिनानिमित्त कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । मुंबई । कुसुमाग्रज जन्मदिन तथा मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि दादर सार्वजनिक वाचनालय धुरू हॉल ट्रस्टच्याच्या वतीने ‘मराठी विचारधारा प्रतिष्ठान’ पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती मराठी सुविचार आणि म्हणी या विषयावर आधारित राज्यस्तरीय मराठी कॅलिग्राफी शब्द-चित्र रेखाटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थी, कलाशिक्षक, चित्रकार, हौशी चित्रकार या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. पहिल्या पाच क्रमांकाना सन्मानचिन्हासह रोख पारितोषिक तर इतरांना सहभाग प्रमाणपत्र २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मराठी भाषा दिवस कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. स्पर्धेचे नियम व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे ९८२१५७४८९१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, ऍड देवदत्त लाड यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!