कृषि औजारे व बियाणे वितरणासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । सातारा । जिल्हा परिषद सेस अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत विविध कृषि औजारे व बियाणे वितरणासाठी दि. 31 जुलै 2023 रोजीपर्यंत इच्छुक पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

यामध्ये शेतकऱ्यांनी पुढील बाबींसाठी अर्ज करावेत. कॅनव्हास/ एचडीपीई ताडपत्री, सायकल कोळपे, 3, 5,  7.5 एचपी ओपन विद्युत पंप, 4, 5 एचपी डिझेल इंजिन, एचडीपीई, पीव्हीसी पाईप, ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, पलटी नांगर, पाचटकुट्टी यंत्र, पेरणीयंत्र इ. मधमाशांच्या पेट्या, सुधारीत / संकरीत बियाणे.

लाभार्थी शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केला जाणार आहे. तसेच मधमाशांच्या मधपेट्य ही योजना 11 तालुक्यांसाठी राबवली जाणार असून मधपेट्यांसाठी जिल्हा परिषद कृषि विभागाचे 50 टक्के व मधसंचलनालयाचे 50 टक्के असे एकूण 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक शेतकऱ्यांनी यासाठी संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज करावेत असे आवाहन विजय माईनकर, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!