सातारा जिल्ह्याचा स्वतंत्र पर्यटन आराखडा तयार करणार – कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर पाचगणी कास बामणोली कोयना बॅक वॉटर तसेच अनेक पर्यटन स्थळे प्रेक्षणीय आहेत या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा पर्यटन विकास केल्यास रोजगाराला चालना मिळेल हे लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पश्चिम भागात चा स्वतंत्र पर्यटन आराखडा अधिवेशनानंतर बनवण्यात येईल अशी स्पष्ट ग्वाही कॅबिनेट मंत्री व पाटण चे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्याच्या वतीने केंद्राकडे तातडीच्या विकास कामांचा योजनांकरिता नीती आयोगाकडे अठरा हजार कोटी रुपये मागण्यात आले असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शनिवारी संपूर्ण शासकीय यंत्रणेची बैठक घेतली त्यानंतर पत्रकारांशी सुमारे पाऊन तास स्वतंत्रपणे संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपस्थित होते .

शंभूराजे देसाई पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा झालेल्या दिल्ली दौरा केला महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले आणि विकास कामांची जी आव्हाने आहेत त्याकरिता नीती आयोगाकडे प्राधान्य क्रमाने करावयाच्या कामांसाठी 18 हजार रुपये कोटींची मागणी केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामासाठी अत्यंत अनुकूल असून या प्रस्तावांना त्यांनी प्रतिसाद सकारात्मक दिला आहे सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न असो पुनर्वसनाचा प्रश्न असो पर्यटन वृद्धि रोजगार जालना रखडलेले सिंचन प्रकल्प याकरिता जास्तीत जास्त निधी ची मागणी अधिवेशनादरम्यान केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर,पाचगणी, कास ,बामनोली, कोयनानगर हा जो नैसर्गिक अधिवासाने समृद्ध असणारा पट्टा आहे येथे पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना सुविधा तसेच रोजगाराच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची मदत केंद्रे याचा बारकाईने अभ्यास करून स्वतंत्र आराखडा बनवला जाईल तसे निर्देश जिल्हा प्रशासनाला मी यापूर्वीच दिले असून हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीसाठी लवकरच सादर केला जाईल सातारा जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी आठ तालुके डोंगरी असून तीन तालुके अंशतः डोंगरी आहेत या भागांच्या स्वतंत्र विकासासाठी व नैसर्गिक आपत्ती टाळण्याकरता स्वतंत्र मनुष्यबळ यंत्रणा आणि करावयाच्या उपाय योजना यांचा एक मार्गदर्शक आराखडा बनवला जाणार आहे याची जिल्हा प्रशासनाबरोबरच स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यातील 411 कोटीच्या जिल्हा नियोजन समितीच्या विकासकामांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे त्यातील कामांची पाहणी करून तातडीचे प्रस्ताव तात्काळ मंजूर केले जातील पुढील अडीच वर्षात दुप्पट वेगाने कामे करून सातारा जिल्ह्यातील रखडलेले जलसिंचन प्रकल्प मार्गी लावले जातील . डोंगरी भागातील पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या स्थानिक निधी कार्यक्रमातून राबवले जातील याकरिता जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतील असेही त्यांनी स्पष्ट केले . कोयना धरण क्षेत्रातील बोटींग प्रकल्प अंतिम टप्प्यात असून लवकरच तो प्रकल्प मार्गी लावला जाईल असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपणास कोणते खाते मिळणार किंवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याकडे जिल्ह्याची धुरा येणार का या प्रश्नाचे उत्तर शंभूराज देसाई यांनी देणे खुबीने टाळले ते म्हणाले हा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा आहे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल शिवसेनेच्या वैधानिक संघर्षावर बोलताना ते म्हणाले मूळ शिवसेना ही आमचीच असून दादर येथील शिवसेनेची मातोश्री भवन ही इमारत पक्षाच्या नावावर नाहीतर ट्रस्टच्या नावावर आहे त्यामुळे ठाणे आणि मुंबई येथे प्रति शिवसेना भवन उभारण्याचा आमचा मानस असून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अभिप्रेत होती त्याच विचारांवर आमचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना-भाजप युती चिन्हावर लढणार असून आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे पक्षाचे दोनशे आमदार निवडून आणण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी निर्देशित केले आहे त्या पद्धतीने आमचे काम सुरू झाले आहे येत्या काही दिवसातच खातेवाटप जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले खाते वाटपामध्ये काही मंत्र्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांचा कुटुंब प्रमुख म्हणून उल्लेख केला होता या प्रश्नावर बोलताना देसाई म्हणाले संजय शिरसाठ नाराज नाहीत त्यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे आम्ही सर्वजण येत आहोत अंतस्थ वाद असतील तर ते तात्काळ चर्चा करुन मिटवले जाते केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासाला चांगलीच गती मिळेल सातारा जिल्ह्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा दृष्टिकोनातूनही प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे लवकरच त्यालाही मान्यता दिली जाईल असे देसाई यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!