दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । कै. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांची ९६ वी जयंती दि. ०२ फेब्रुवारी रोजी सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल ॲण्ड ज्यू. कॉलेज, फलटण येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व “दत्तक – पालक” योजनेअंतर्गत काही दत्तक पालक उपस्थित होते. यावेळी दत्तक विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच फलटण शहरातील नामांकित स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्राची महेश बर्वे यांचे महिला आरोग्य विषयी मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतानाच कै. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या आपल्या नात्यातून असणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. तसेच डॉ. सौ. प्राची महेश बर्वे यांच्या महिला आरोग्यासाठी उत्तम अशा मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना निश्चितच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कै. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले व अभिवादन करण्यासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे उपाध्यक्ष श्री. सी. एल. पवार सर, मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संचालिका सौ. ज्योती सचिन सूर्यवंशी (बेडके), संचालक श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), श्री. शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके), श्री. प्रकाश तारळकर, प्रशासन अधिकारी श्री. पी. एस. पवार सर, संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
याच कार्यक्रमात सुरुवातीला ‘वेणूनाद’ या विद्यार्थिनींच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर विद्यार्थी दत्तक पालक योजनेंतर्गत विद्यार्थिनींना गणवेश, वह्या, पुस्तके, दफ्तर तसेच इतर शालोपयोगी आवश्यक त्या गोष्टींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी दत्तक पालक योजनेंतर्गत विद्यार्थिनींना दत्तक घेतलेल्या माहेश्वरी समाजातील महिला व इतर मान्यवर पालकांचा सत्कार करुन आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुजाता पवार – जाधव यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सौ. भागवत मॅडम यांनी केले.