शुक्रवार पेठेतील युवकांनी मित्राच्या वाढदिवसाला केले रक्तदान; १२४ मित्रांचा सहभाग


दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । आपल्या भागामध्ये राहणारे जर मित्र एकत्र आले तर काहीही करू शकतात हे आपण नेहमीच बघितले आहे. असाच उपक्रम फलटण शहरामधील शुक्रवार पेठेमध्ये मित्रांनी मिळून केलेला आहे. फलटणच्या शुक्रवार पेठेमधील यश तुकाराम घाडगे याचा वाढदिवस मित्रांनी साजरा करण्याचे ठरवले. त्यानंरत यश घाडगे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “रक्तदान शिबिरा”चे आयोजन केले. आणि रक्तदात्याला एक अनोखे गिफ्ट म्हणून ऑक्सिजन देणारी झाडांची रोपे देण्यात आली.

ह्या अनोख्या वाढदिवसासाठी राजाभाऊ देशमाने, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर शेख, अक्षय अब्दगिरे, युवा नेते सनी मांढरे, सनी शिंदे, मफु कर्वे, युवा नेते प्रीत खानविलकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली.


Back to top button
Don`t copy text!