सी. के. नायडू शालेय क्रिकेट स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेचे घवघवीत यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । फलटण । येथील मुधोजी महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या सी. के. नायडू शालेय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मुधोजी महाविद्यालय येथे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. दोन दिवस संपन्न झालेल्या स्पर्धेचे अंतिम सामने दि. २२ रोजी पार पडले. यामध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल (CBSC) तर मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज व श्रीमंत मालोजीराजे विद्यालय (शेती शाळा) यांचे संघ विजयी ठरले.

यावेळी फलटण तालूका क्रीडा समन्वयक गणेश गायकवाड, मुधोजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य वेदपाठक, फलटण क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, क्रीडा शिक्षक स्वप्नील पाटील, धनश्री क्षिरसागर, अमोल नाळे, अमित काळे, तायप्पा शेंडगे, राहूल पोतेकर, सुहास कदम, कुमार पवार, सोमनाथ चौधरी, टिल्लू चौधरी, अविनाश अहिवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळ प्रथम १४ वर्षा खालील संघाचे सामने झाले यावेळी या गटाचा अंतीम सामना श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल (CBSE) ज्युनिअर कॉलेज जाधववाडी व श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, जाधववाडी, फलटण (SSC) यांच्यात झाला यामध्ये श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज जाधववाडी, फलटण (CBSE) यांनी श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज जाधववाडी, फलटण (SSC) यांचा सात गडी राखून पराभव केला.

१७ वर्षाखालील स्पर्धेचा अंतिम सामना मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज जाधववाडी, फलटण (CBSE) यांच्यात झाला यामध्ये मुधोजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज या संघाने श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल (CBSE) चा ३० रनने पराभव केला.

१९ वर्षा खालील स्पर्धेत मालोजीराजे शेती विद्यालय यांनी श्रीमंत शिवाजीराजे इग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज, जाधववाडी, फलटण (SSC) यांचा ३५ रनांनी पराभव केला.

वरील तिन्ही विजयी संघ जिल्हास्तरीय सी के नायडू स्पर्धेसाठी पात्र ठरले असून ते सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकूल सातार येथे होणाऱ्या सी के नायडू स्पर्धेसाठी जिल्ह्यातील इतर संघांशी स्पर्धेत सहभागी होतील.


Back to top button
Don`t copy text!