दैनिक स्थैर्य | दि. २१ जुलै २०२४ | फलटण |
खटकेवस्ती येथील प्रगतिशील बागायतदार, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे यांचे बंधू अशोक दिलीप गावडे यांचे आकस्मिक निधन झाले. त्याच्या रक्षाविसर्जन नदीपात्रात न करता स्मशानभूमी व स्वतःच्या शेतात करून स्मृती जतन करण्यात आल्या.
अत्यंत बंधूप्रेम, कौटुंबिक जिव्हाळा, सामाजिक योगदान, धार्मिक दातृत्व यात बंधूचा सिंहाचा वाटा होता. आपली जीवाभावाची सावली हरपली. त्यांचा रक्षाविसर्जन नदीपात्रात न करता शेतात करावे, या प्रा. रविंद्र कोकरे सर यांच्या संदेशाचे अनुकरण आणि डॉ. शिवाजीराव गावडे यांनी आपल्या मातोश्रींचे निधन झाले. रक्षाविसर्जन नदीपात्रात न करता स्मशानभूमीमध्ये आणि स्वतःच्या शेतात वृक्षारोपण करून रक्षाविसर्जन केले. तोच आदर्श घेऊन पै. बजरंग गावडे कुटुंबियांनी रक्षाविसर्जन स्वतःच्या रानातच करण्याचा निर्णय घेतला. स्वर्गीय अशोक गावडे स्मृतीसाठी वृक्षारोपण करून चिरंतन आठवणींच्या स्मृती जतन करण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, डॉ. शिवाजीराव गावडे, श्रीराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बजरंग खटके, वस्ताद अनिल गावडे, राहुल इवरे, अरुणा नाझीरकर, धनश्री गावडे, पै. हणमंत उर्फ मुन्ना गावडे, पै. चेतन गावडे, पै. केशव गावडे, पै. रोहन गावडे, राजू गावडे पाटील, प्रगती माळवे, बबलू कैलास गावडे या सर्वांच्या हस्ते नारळाचे वृक्ष देऊन लागवड करण्यात आली.