‘गजानन सुझुकी’तर्फे इ. १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२३ | सातारा |
सातार्‍यातील गजानन सुझुकी यांच्यातर्फे इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी सुझुकीच्या सर्व बाईक व स्कूटरवर विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. इ. १० वी व १२ वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांना मिळालेल्या गुणांच्या तीन पट सवलत सुझुकी दुचाकी खरेदीवर दिली जाणार आहे. आपली मनपसंद ‘सुझुकी टू व्हीलर’ बुकिंग करताना गुणपत्रक सोबत आणावे, असे आवाहन गजानन सुझुकीचे संचालक श्री. सचिन शेळके सर यांनी केले आहे.

या ऑफरवर गजानन सुझुकीकडून सर्व शाळा, कॉलेज व जिमला जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी Gixxer Naked 150 CC मोटारसायकल खरेदीवर एकूण रू. १२५००/-*** पर्यंतचा फायदा मिळणार आहे. नवीन सुझुकी V-STROM SX 250 CC मोटारसायकल खरेदीवर रू. ६९९९/- पर्यंतचे आकर्षक ब्रँडेड रायडींग जॅकेटसह इतर फायदे मिळणार आहेत. याशिवाय सर्व मोटारसायकल खरेदीवर सुझुकीची ५ वर्षांची ऐच्छिक वॉरंटी फ्री दिली जाणार आहे.

तसेच गजानन सुझुकीमध्ये नामवंत फायनान्स कंपन्यांमार्फत कमीत कमी रू. २०२३/-*** भरून नवीन सुझुकी गाडी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. ग्राहकांना सुझुकी दुचाकीच्या खरेदीवर भरघोस फायदा मिळणार असून सर्वांनी आजच आपल्या गजानन सुझुकी शोरूमला भेट देऊन मनपसंद वाहन बुकिंग करावे व सर्व विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन सुझुकीचे संचालक श्री. सचिन शेळके सर यांनी केले आहे.

गजानन सुझुकीने सर्व सुझुकी मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध केली असून यामध्ये ACCESS 125 CC, AVENIS 125 CC अशी मॉडेल्स एफआय व एबीएस सिस्टीमसह एसईपी व एसओसीएस टेक्नॉलॉजिमध्ये उपलब्ध आहेत. या स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेव्हीगेशन, कॉल एसएमएस आणि व्हॉटस्अप अलर्टस्, मिस्ड कॉल अलर्ट आणि कॉलर आयडी, स्पीड एक्सिडींग अलर्ट, फोन बॅटरी लेवल डिस्प्ले आणि ईटीए अपडेटस् या सर्व बाबींची माहिती चालकास गाडीच्या डिजिटल मीटरने मिळते.

सुझुकी कंपनीकडून अ‍ॅक्सेस १२५ सीसी व अवेनिस १२५ सीसी मध्ये आकर्षक नवीन कलर आलेले आहेत. नवीन ऑलराऊंडर सुझुकी अवेनिस १२५ सीसी मध्ये मोठी डिकी स्पेस, ६४ कि.मी. मायलेज, फ्रंट पॉकेट व आरामदायी लेग स्पेसमुळे सुझुकी अवेनिस १२५ सीसी सर्व शाळा, कॉलेज तरुण-तरुणींसाठी अत्यंत सोईची ठरते.

गजानन सुझुकीने गेली १४ वर्षे ३५००० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात १५ व्या वर्षात सुझुकीचे नामांकित डिलर असा नावलौकिक मिळविला आहे. सुझुकीतर्फे गजानन सुझुकीला अनेकवेळा उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

तरी ग्राहकांनी अधिक माहितीसाठी आमच्या गजानन सुझुकी सातारा, फलटण, वाई, कोरेगाव, नागठाणे या शोरूमशी ८६०००२०९३१/३२/३३/३४/३७/३८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गजानन सुझुकीतर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!