बीव्हीजीच्या अरुण बारगजे यांचा साहित्य संमेलनात सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । लातूर ।  उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२ ते २४ एप्रिल दरम्यान होणार आहे. संमेलनाच्या पूर्व संध्येला अजय- अतुल संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. संगीत रजनीचे मुख्य प्रायोजकत्व भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) स्वीकारले होते. या कार्यक्रमात बीव्हीजी ॲग्रोटेक कंपनीचे मार्केटींग व सेल्सहेड अरुण बारगजे यांचा सन्मान संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे (राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाला शहरातील लाखो नागरिक उपस्थित होते.

आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या सिमेवर उदगीर शहर वसले आहे. शहरावर प्रामुख्याने कन्नड भाषेचा प्रभाव आहे. पुर्वी हे शहर बीदर शहरात होते. शहरापासून हैदराबाद जवळ असल्याने येथे उर्दु भाषेचाही प्रभाव जाणवतो. कन्नड, उर्दु व तेलगु भाषेचा प्रभाव असलेल्या शहरात मराठी साहीत्य संमेलन होत असल्याने मराठी साहीत्याचा खऱ्या अर्थाने सन्मान झाल्याची प्रतिक्रिया या वेळी बारगजे यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!