वेणेगाव येथे सव्वातीन लाखाची घरफोडी


दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील वेणेगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या बंद घरात घरफोडी करुन दोघांनी ३ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबतची तक्रार बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ ते दि. १९ फेब्रुवारी २०२२ वेणेगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या श्यामा सदन नाव असणाऱ्या घराचे कुलूप तोडून तेथीलच उदय रामचंद्र कांबळे, संबोधी रामचंद्र कांबळे यांनी आत प्रवेश केला. घरातील लाकडी सोफा, लाकडी टेबल पंचधातु भगवान बुद्धाची एक मूर्ती, प्लास्टिकच्या खुर्च्या, भिंतीवरील घड्याळ, १ लाख किमतीचे संसार उपयोगी साहित्य, डायनिंग टेबल, सोफा कम बेड, टीपॉय, कपाट असा सुमारे ३ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार शामराव भिवाजीराव वेणेगावकर, मूळ रा. वेणेगाव सध्या रा. विक्रोळी मुंबई यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.


Back to top button
Don`t copy text!