दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । सातारा । खेड येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 36 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते 15 सप्टेंबर रोजी च्या दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान हेमंत सोपान गवते वय 67, रा. सत्यम नगर, कोरेगाव रोड, खेड, ता. सातारा यांच्या घराच्या सेफ्टी डोअरचा कोयंडा तोडून सुमारे 36 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.