दौलतनगरात घरफोडी, दहा हजारांचा ऐवज लंपास


दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । येथील दौलतनगरमधून शशिकांत संभाजी महामुलकर(वय30) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दहा हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना दि.6 रोजी रात्री घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शशिकांत महामुलकर हे वीजवितरणमध्ये नोकरीला आहेत. काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांसमवेत बाहेरगावी गेले होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याची किंमत सुमारे दहा हजार रुपये होती. महामुलकर कुटुंबीय घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.


Back to top button
Don`t copy text!