सदरबझार येथे घरफोडी


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा येथील सदर बझार परिसरातील गुलमोहर कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी 35 हजारांचा टीव्ही चोरुन नेल्याची तक्रार सखाराम बापू पिसाळ (वय 67) यांनी सातारा शहर पोलीस ठण्यात दिली आहे. ही घटना दि. 15 सप्टेंबर रोजी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, पिसाळ यांचे घर बंद असताना चोरट्याने त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि 35 हजार रुपयांची टीव्ही, एका बँकेच्या लॉकरची चावी लंपास केली. दरम्यान, पिसाळ कुटुंबीय शनिवार, दि. 2 रोजी घरी परतल्यानंतर चोरीचा उलगडा झाला. यानंतर त्यांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!