दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा येथील खिंडवाडी परिसरात असणाऱ्या अजिंक्यनगर येथे घराच्या दरवाजाचे लॉक तोडून ४७ हजार ३00 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड चोरुन नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवार, दि. ११ रोजी रात्री आठ ते रविवार, दि. १२ रोजी दुपारी सव्वाबारा या वेळेत घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, निलेश नंदकुमार शिंगणापूरकर (वय ३६, रा. प्लॉट नंबर ४, सर्व्हे नंबर ९/८/३, घर क्रमांक ७३३, तीर्थरुप, अजिंक्यनगर, खिंडवाडी, ता. सातारा) हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार रात्री ते रविवार दुपारी या कालावधीत त्यांच्या घराच्या सेफ्टी डोअरच्या दरवाजाचे लॅच असलेले लॉक अज्ञाताने तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४७ हजार ३00 रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरुन नेला. याबाबतची तक्रार निलेश शिंगणापूरकर यांनी रविवार, दि. १२ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करत आहेत.