स्थैर्य, फलटण, दि. २६ : गेल्या दोन महीन्यापासून फलटण शहरात लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान, स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय या भागासह फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोपेड मोटार सायकल वरून जाणार्या येणार्या विशेषत: महिला व मुलींना टार्गेट करून एक अनोळखी २० ते २२ वर्षे वयाचा चोरटा त्यांचा पाठलाग करीत त्यांचा पाठोपाठ मोटार सायकल चालवित जात आजु बाजुला तसेच मागे पुढे कोण नाही हे पाहून संधी मिळताच महीलाच मुलीचे हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून याशिवाय रस्त्याने मोबाईल फोनवर बोलत जाणार्या महिला व मुली यांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने ओढून पोबारा करीत होता, त्यास फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांच्या टीमने चोरट्यासह सहआरोपीना जेरबंद केलेले आहे व त्याच्याकडील दोन लाख चोवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी स्पष्ट केले.
फलटण शहर पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, नितीन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.