राजुरीजवळ एसटीची ऊस वाहतुकीच्या बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक; बैलगाडीचालकासह एक बैल ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) गावच्या हद्दीत पुणे-पंढरपूर रस्त्यावर एसटी बसने ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीचालकासह एक बैल ठार झाला असून दुसरा बैल जखमी झाला आहे. या अपघाताची खबर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वैभव राजेंद्र गावडे (रा. राजुरी) यांनी दिली असून पोलिसांनी बसचालक भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे (वय ४४, रा. रेड्डे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

सोनू अभिमन्यू सोनवणे (वय ३१, राहणार बोधवड, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव) अपघातात ठार झालेल्या ऊस बैलगाडीचालकाचे नाव आहे.

या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ८.३०. वाजण्याच्या सुमारास राजुरी (तालुका फलटण) गावच्या हद्दीत दीप गार्डन या हॉटेलसमोर पुणे ते पंढरपूर जाणारे रोडवर भाऊसाहेब श्रीमंत नवत्रे या एसटी ड्रायव्हरने त्याच्या ताब्यातील एसटी बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३३५९) ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने अविचाराने भरधाव वेगात बेदर्कारपणे बरड बाजूकडून राजुरी बाजूकडे चालवून सोनू अभिमन्यू सोनवणे (वय ३१, राहणार बोधवड, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव) यास पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये सोनू अभिमन्यू सोनवणे याला व बैलगाडीला असलेल्या दोन बैलापैकी एका बैलाला गंभीर जखमी करून सोनू अभिमन्यू सोनवणे व एका देशी जातीच्या बैलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी त्याच्यावर फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!