दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । सातारा । कलेढोण – येथील मुख्य बाजारपेठेत असणारे किसन पावणे (रा. गारुडी, ता. खटाव) यांचे पूजा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडून २० ग्रॅम सोने, पाच किलो चांदीची मोड व नवीन चार किलो चांदी असा चार लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिस तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील मुख्य बाजारपेठ पावणे यांचे पूजा ज्वेलर्स आहे. रात्री सुमारे पावणेदोनच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा तोडून प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील लाकडी कप्यातील २० ग्रॅम सोने, पाच किलो चांदीची मोड व नवीन चार किलो चांदी असा चार लाख ७३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक दीक्षित, वडूजचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराजे देशमुख यांनी भेट घेऊन गुन्ह्याची माहिती घेतली. चोरांचा शोध घेण्यासाठी साताऱ्याहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.