बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. २२ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. २२, वाकोला या विभागाच्या वतीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, वकील किंवा तत्सम पदव्या संपन्न करणाऱ्या विध्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ तसेच “भारतीय संविधान” या विषयावर विद्यार्थी / विद्यार्थीनी भाषण स्पर्धा बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष व गट क्र. २२ चे प्रतिनिधी मा. लक्ष्मणजी भगत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ विहार,सिद्धार्थ नगर, वाकोला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी बुद्ध पूजा व धार्मिक विधी हर्षदा गायकवाड, कांचन जाधव, सुनीता पवार आदी महिलांनी सुमधूर वाणीने पार पाडला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले.

सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोदजी मोरे, माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, गट क्र. १९ चे गटप्रतिनिधी भागूराम सकपाळ, महाराष्ट्र शासनाचे सहसचिव दिनेश डिंगळे आदी मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्व व कोणत्याही परिस्थितीत प्रथम शिक्षण घेणे कसे आवश्यक आहे तसेच भारतीय संविधान या विषयावर जास्तीत जास्त अभ्यास करून जनमानसात संविधान जागर करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मा. लक्ष्मण भगत यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गट क्र. २२ व संलग्न सर्व शाखा, त्यांचे अध्यक्ष, चिटणीस, पदाधिकारी, कार्यकारिणी मंडळ, महिला मंडळ यांनी अथक परिश्रम करून मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सिद्धार्थ सोनावणे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!