सर्व समाजघटकांना न्याय देऊन राज्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । मुंबई । शेतकरी, उद्योजक, व्यापारी, कामगार, कलाकार, महिला, विद्यार्थी, सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्यादृष्टीने आरोग्य, शिक्षण, कृषी, जलसंपदा, उर्जा, सांस्कृतिक यासह सर्व विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद करून महाराष्ट्र राज्याला कायम प्रगतीपथावर ठेवणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले, सलग दोन वर्ष कोरोना प्रादूर्भावामूळे राज्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. या परिस्थितीतून बाहेर पडून विकासाची गती पकडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील श्‍

शासनाने नियोजनबध्द प्रयत्न केले असून सादर झालेला अर्थसंकल्पातून ते दिसनू येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करतांना राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल याची दक्षता घेतली असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी विभागनिहाय कृषी संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. जलसंपदा विभागासाठी तब्बल १३ हजार २५२ कोटींचा भरीव निधी ठेवण्यात आला असून शेततळयासाठी ७५ हजारा पर्यंत अनुदान वाढविले असून पशुसंवर्धनाला चालना देण्याचे उल्लेखनीय निर्णय घेण्यात आले आहेत.

कोरोना महामारीत आलेले अनुभव लक्षात घेता आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी ११ हजार कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अद्ययावत वैद्यकीय शिक्षण सुविधा उभारणे आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढविणे या बरोबर प्रत्येक जिल्हयात महिला रूग्णालय तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी झोपडपटटी सुधार योजनेला गती देणे, अल्पसंख्याक वर्गासाठी स्वतंत्र पोलीस भरती योजना राबविणे, ओबीसी राजकीय आरक्षणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे आदी योजनांचाही या अर्थसंकल्पात समावेश आहे.

ऊर्जानिर्मीती आणि विज वितरण सुविधा उभारण्यासाठी ९ हजार ९०० कोटी रूपयाची तर सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सिंदाळा (६० मेगावॅट), उस्मानाबाद जिल्यातील कौडगाव, धुळे जिल्ह्यातील साक्री तसेच वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात एकुण ५७७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या शिवाय राज्यात लहान मोठ्या असंख्य सौर प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शालेय व शैक्षणिक सुविधांच्या बळकटीकरणासाठी या अर्थसंकल्पात २ हजार ३५४ तर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागासाठी १ हजार ६१९ कोटी रूपय एवढा भरघोस निधी देण्यात आला आहे. कोरोना प्रादूर्भावातील निर्बधामुळे अडचणीत आलेल्या कलाकार व कलावंतांना आधार देता यावा यासाठी या अर्थसंकल्पात सांस्कृतिक विभागासाठी १९३ कोटी रूपये निधी देण्यात आला आहे. कोरोना प्रादूर्भावातील निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या कलाकार व कलावंतांना आधार देता यावा यासाठी या अर्थसंकल्पात सांस्कृतिक विभागासाठी १९३ कोटी रूपये निधी देण्यात आला आहे. याशिवाय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे संगीत महाविद्यालय सुरू करण्यासाठी १०० कोटीच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत राज्यातील सर्व समाजघटकांचा उत्कर्ष व्हावा आणि विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र राज्य गतिमान राहावे या उददेशाने सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचे श्री.देशमुख यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!