जेतवन बुद्धविहारात बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । मुंबई । आषाढी पौर्णिमा म्हणजेच वर्षावासाचा प्रारंभ या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 578 अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी येथे जेतवन बुद्धविहारात आयुष्यमान श्रीधर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मण भगत साहेब यांच्या शुभहस्ते बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

सदर प्रसंगी आदर्श बौद्धाचार्य संतोष जाधव गुरुजी यांच्या शुभहस्ते धार्मिक विधी विधीवत संपन्न करण्यात आला, सदर ठिकाणी लोकप्रतिनिधी कालिदास कोळंबकर साहेब, बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस संदेश खैरे साहेब, गटक्रमांक १३ शिवडी विभागाचे गटप्रमुख रामदास गमरे साहेब, भाई जोशी, विभागाचे प्रतिनिधी समाजसेवक आणि रिपब्लिकन सेना दक्षिण मुंबई अध्यक्ष भगवान साळवी, दत्ताराम गुरव, शांतिदूत संतोष जाधव आदी मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावून या मंगल प्रसंगी आपापल्या परीने मौलिक मार्गदर्शन केले, त्याचबरोबर ज्यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ते प्रमुख अतिथी आदरणीय कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत साहेब आपल्या भाषणात पुढे म्हणाले “याच मंगल दिनी महामायेला गर्भधारणा झाली तसेच याच दिनी सारनाथ येथे तथागतानी धम्मचक्र प्रवर्तन करून पाच भिक्खूना धम्मदीक्षा व धम्मोपदेश देऊन भिक्खू संघाची स्थापना केली तसेच वर्षा म्हणजे पाऊस व वास म्हणजे वास्तव्य म्हणजेच पावसाळ्यात एकाच ठिकाणी वास्तव्य करून धम्म प्रचार प्रसाराचे कार्य करण्याचा आदेश दिला आणि हाच योग साधून आज माझ्या हस्ते बुद्घामुर्ती प्रतिष्ठापना केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सदर विहार पात्र करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो” अशा शब्दात त्यांनी आपले अमूल्य विचार मांडले.

शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या शुभहस्ते सर्व पाहुण्यांसह महिला मंडळ, तरुण मंडळ व सर्वांना सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रम सुरू करण्याकरता शाखेचे चिटणीस अनंत गोविंद मोहिते, सचिव काशिनाथ पवार, खजिनदार रायबा सकपाळ, माजी चिटणीस बबन लोखंडे आणि ज्ञानेश्वर सकपाळ तसेच पंचशील मंडळाचे कार्यकर्ते मंगेश जाधव, सागर मोहिते, वीरेंद्र गमरे नितेश मोरे, दर्शन जाधव आदी कार्यकर्त्यांनी तसेच रमाई महिला मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी अमूल्य योगदान दिले त्याकरता त्यांचे आभार मानण्यात आले, त्यासोबत ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली त्या स्वाती मोहिते, मंगेश सकपाळ यांना देखील सत्कार सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमांच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात अध्यक्ष श्रीधर मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व उपस्थित मान्यवर पाहुणे कार्यकर्ते सभासद यांचे आभार मानून हे बुद्धविहार केवळ सुरू करण्यात आले नसून येथे धम्मप्रचार धम्मप्रसाराचे अखंड कार्य घडत राहील असा विश्वास देऊन कार्यक्रमाचे सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!