बर्ड फ्लूच्या वृत्तानंतर दोन दिवसांत 10 % घसरल्या ब्रॉयलरच्या किमती, अंड्यांच्या भावातही मोठी घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.८: कोरोना काळात चिकन आणि अंड्यांच्या घटलेल्या मागणीमुळे २०२० च्या पहिल्या सहामाहीत ताेटा सहन केल्यानंतर कुक्कुटपालन उद्योग दुसऱ्या सहामाहीत आला आला होता तोच बर्ड फ्लूच्या घटनांनी पुन्हा एकदा कुक्कुट पालन व्यवसायाची धास्ती वाढली आहे. कोंबड्यांत बर्ड फ्लूची लक्षणे न दिसल्यानंतरही दोन दिवसांत ठोक बाजारात चिकन आणि अंड्याच्या किमतीत १० % घसरण आली आहे. बर्ड फ्लूची प्रकरणे वाढल्यास पुन्हा एकदा चिकन व अंड्यांची मागणी घटेल आणि उद्योगाला नुकसान सोसावे लागू शकते, अशी भीती व्यावसायिकांना आहे.

दिल्लीच्या गाजीपूर कोंबडा बाजारपेठेत सोमवारी ब्राॅयलर चिकनचे भाव प्रति किलो ९८ ते १०० रु. होते. मंगळवारी बाजार बंद होता. बुधवारी ब्राॅयलरचे दर घटून ८५ ते ८८ रु. प्रति किलो झाले. राजस्थान आणि हरियाणाच्या बाजारांत ब्राॅयलरच्या भावांत ५ ते १० टक्क्यांची घसरण आली. याच पद्धतीने शनिवारपर्यंत दिल्लीत ६०० रु. शेकडा विकणाऱ्या अंड्यांच्या किमतीत बुधवारी १० टक्क्यांची घसरण होऊन ५५५ रु. झाल्या. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शनिवारी अंड्यांच्या किमती ५५५ रु. शेकडा होत्या. त्यात घट होऊन ५०५ रु. शेकडा झाल्या आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये ब्रॉयलर चिकनच्या भावात चढ-उतार न होता बुधवारी तो १२० रु. किलो आहे. अंड्याच्या भावात शेकडा ४० रु. घसरण आहे. औरंबादेत दोन दिवसांपूर्वी अंडी शेकडा ५४० रु. तर बुधवारी तो शेकडा ५०० रु. राहिला.

व्यावायिकांनुसार, सध्या चिकन व अंड्यांच्या मागणीत घट आली नाही. मात्र, धारणा बिघडल्याने भाव पडले आहेत. मात्र, बर्ड फ्लू प्रकरणे वाढल्यास नुकसान वाढू शकते. पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे खजिनदार रिकी थापर म्हणाले, सध्या केवळ कावळे आणि बदकांत बर्ड फ्लू दिसून येत आहे. यापुढे स्थितीवर ती अवलंबून असेल. दुसरीकडे, केंद्रीय पशुपालन मंत्री गिरिराज सिंह यांनी बुधवारी लोकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. केरळमध्ये बदक वगळता बर्ड फ्लू आतापर्यंत वन्य पक्षांमध्ये दिसला आहे.


Back to top button
Don`t copy text!