दैनिक स्थैर्य | दि. 08 जानेवारी 2023 | फलटण | युवा मोर्चाचे पदाधिकारी हे भाजपचा मुख्य कणा म्हणुन काम करत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्या ला खांदा लावून काम करावे लागणार आहे. केंद्र व राज्य सरकारने व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत; असे मत जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या सूचनेनुसार मंडल अध्यक्ष संतोष गावडे यांनी युवा मोर्चाच्या पुर्व मंडल पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ननावरे, सरचिटणीस संतोष सावंत उपस्थित होते.
युवा मोर्चा ने नमो चषक स्पर्धा आयोजित केल्या आहेत; त्यामध्ये जास्तीत जास्त तालुक्यातील मुलांना समावुन घेऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात. स्थानिक खेळाडूना संधी द्यावी. जास्तीत जास्त आँनलाईन खेळाडूची नमो अँपवर नोंद झाली पाहिजे. तसेच सर्व सामान्य जनतेला शासकीय योजनेचा फायदा होईल; असे काम करावे असे आवाहन केले यावेळी बजरंग गावडे, सचिन कांबळे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक संतोष गावडे यांनी केले तर आभार प्रतिक पवार यांनी मानले.