दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा मंगळवार, दि. २७ व बुधवार, दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण, ता. फलटण येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले व जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.
या स्पर्धेमध्ये मुलांच्या १९ वर्षांखालील गटामध्ये चि. सिद्धांत साळुंखे याने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात चि. साहिल सूळ याचा द्वितीय क्रमांक तर चि. मिथीलेश तांबे याचा तृतीय क्रमांक आला.
मुलींच्या तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात कु. प्रज्ञा गांधी द्वितीय क्रमांक, तर कु. मधुरा गुजर हिने पाचवा क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी बुध्दीबळपटूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक संतोष तोडकर यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, प्राचार्य सुधीर अहिवळे, माध्यमिकचे उपप्राचार्य नितीन जगताप, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षिका पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, क्रीडा समितेचे सचिव सचिन धुमाळ, बी. बी. खुरंगे, अमोल सपाटे, अमोल नाळे, डी. एन. जाधव तसेच सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.