
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। फलटण। येथील श्री सद्गुरु प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल चा मार्च 2025 माध्यमिक शालांत परीक्षा चा निकाल शंभर टक्के लागला असून 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तसेच प्रथम श्रेणीमध्ये 10 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीमध्ये 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील श्रावणी सचिन सस्ते या विद्यार्थिनीने 92.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर रोहन बापी मजुमदर याने 89.20 टक्के गुण मिळवून दुसरा व धनश्री राहूल तेली या विद्यार्थिनीने 88.20 गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, चेअरमन अॅड मधुबाला भोसले, सेक्रेटरी रणजितसिंह भोसले, प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, प्राचार्या सौ. नाझनीन शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.