फलटण : वाजेगाव ता. फलटण येथे फित कापून विविध व्यवसायांचे उदघाटन करताना राम निंबाळकर व अन्य मान्यवर. |
स्थैर्य, फलटण, दि.१९ : ग्रामीण भागामध्ये बहुतांश सोयी सुविधा पोहचविणे आवश्यक असून आगामी काळामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसाय कौशल्य अवगत करुन तेथील गरज ओळखून योग्य व्यवसाय निवडल्यास त्यामध्ये निश्चित उज्वल यश प्राप्त होईल असा विश्वास उद्योजक राम निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाजेगाव, ता. फलटण येथील शिवशंभु मोटर्स व क्रेन सर्व्हिस आणि माउली कृषी सेवा केंद्र या व्यवसायांचे उदघाटन राम निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, शिवाजी पिसाळ, कराड अर्बन बँकेचे शंकर महानवर, काशीराम मोरे, भानुदास मतकर, स्वप्निल पिसाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.