लग्नादिवशीच नवरामुलाची रवानगी कोवीडसेंटरमध्ये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, जावली, दि.०५ : कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऐन बोहल्यावर चढण्याच्या वेळीच वराची रवानगी कोविड सेंटरमध्ये झाली. या घटनेची चर्चा परिसरात सुरू आहे.

जावली तालुक्यातील काटवली या गावात एका युवकाचं लग्न शुक्रवारी (दि.4) आयोजित केलं होतं. त्याकरिता शासकीय नियमांना अनुसरून दोन्ही बाजूच्या 25 लोकांच्या उपस्थिती बंधनकारक आहे. हे कार्य निर्विघन पार पडावे, अशी घरच्यांची अपेक्षा असते. त्याकरिता आता लग्नसोहळयात उपस्थितांना कोव्हिडं टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार नवरा मुलगा व नातेवाईकांनी दोन दिवस अगोदर कोव्हिडं टेस्ट केली होती. परंतु अहवाल मात्र आलाच नव्हता. शुक्रवारी सकाळी परगावाहून नवरदेव आपल्या घरच्याच लोकांसमावेत लग्नगावात हजर झाला. पाठोपाठ बाधित असल्याचा अहवाल धडकला अन् सर्वांच्या उत्साहावर विरजण पडलं. नवरदेवच पॉझिटीव्ह आल्याने दोन्हीकडील मंडळींनी लग्न लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दोनच दिवसांपूर्वी काटवलीत साखरपुढा सुद्धा कोव्हिडं नियमांना अधीन राहूनच केला आहे. पण आता नवरदेवासह नातेवाईक बाधित आले असतील तर साखरपुडा प्रसंगी उपस्थित राहणार्‍यांना कोव्हिडं टेस्ट करावीच लागणार आहे. ग्रामदक्षता कमिटीने तात्काळ दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना कोव्हिडं टेस्ट करण्यास सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!