बेशुद्ध पडून दोघांचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४  एप्रिल २०२२ । सातारा । उलटी येऊन बेशुद्ध पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सातारा येथे घडली. दुसऱ्या घटनेत भाटमरळी ता. सातारा येथील एक जणाचा बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ एप्रिल रोजी साडेसात वाजण्याच्या पूर्वी यश (पूर्ण नाव समजू शकले नाही) वय १५, रा. आशा भवन, कोडोली ता. सातारा याला राहत्या ठिकाणी उलटी होऊन तो बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. लिपारे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

दुसऱ्या घटनेत दि. ६ एप्रिल रोजी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सुधीर औदुंबर पवार, वय ४३ रा. भाटमरळी हे राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आल्यामुळे त्यांना प्रथम कुमठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची डॉ. भोसले यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली.


Back to top button
Don`t copy text!