बॉस आयपीटीव्हीचे मोठे पायरसी रॅकेट उघडकीस, जगभरात भारतीय प्रीमियम कंटेंट अवैधरित्या प्रसारीत केल्याप्रकरणी अनेकांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२४: नुकत्याच घडलेल्या घटनेनुसार, फरीदाबाद सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार, फेसमास्क व पीपीई किट तयार करणारी रिस्ले प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, विविध भारतीय व आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्टर्सचे सिग्नल चोरत असल्याचा तसेच बॉक्स विक्री, टेक सपोर्ट, बॉक्स अॅक्टिव्हेशन इत्यादी बॅकएंड कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण उद्योगाला कोट्यवधींचा फटका बसत होता.

प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारापैकी जवळपास 70-80% भागाला पायरेट्सचा विळखा बसला होता. या भागात भारतीय ब्रॉ़डकास्टर्सना कोणतेही शुल्क न देता 400 पेक्षा जास्त भारतीय व असंख्य आंतरराष्ट्रीय चॅनल्स अवैधरित्या दाखवले जातात. जगभरातील प्रमुख पायरेट्स बंद झाले तर या उद्योगाला अंदाजे जवळपास 113 दशलक्ष डॉलर्सचा फायदा होईल. विदेशात राहणाऱ्यांसाठी ओव्हर-द-टॉप (ओटीटी) ऑडिओ व्हिड्युअल साऊथ एशियन कंटेंट प्रदान करणाऱ्या यप्पटीव्हीने रिस्ले लिमिटेडचा पर्दाफाश केल्याने संपूर्ण उद्योगासाठी हे सकारात्मक पाऊल ठरले आहे.

स्टार, कलर्स यासारख्या प्रमुख खासगी ब्रॉडकास्टर्सचादेखील बॉस आयपीटीव्हीविरोधातील मोहिमेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठींबा आहे. रिस्ले कंपनीअंतर्गत हा पायरेट्सचा समूह काम करत असून जगभरात बॉस आयपीटीव्ही सर्व्हिसची विक्री करत तो प्रीमियम भारतीय कंटेंट अवैधरित्या दाखवतो.

बॉस आयपीटीव्हीसारखे पायरेट्स आपले देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वैध सिग्नल्स अडवतात आणि अवैधरित्या जगभरातील लोकांना ते सिग्नल ब्रॉडकास्ट करतात. परिणामी यप्पटीव्हीसारखे कायदेशीररित्या लायसन्स घेणारे किंवा हक्क बाळगणारे, ज्यांना हे कार्यक्रम अधिकृतरित्या दाखवता येतात, त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. भारतातून चालणाऱ्या किंवा अपलिंक झालेल्या या गुन्ह्यांमुळे तोटा सहन करावा लागतो. अशा चॅनल्सच्या सबस्क्राइबर्सच्या वैयक्तिक माहितीला यामुळे धोका संभव शकतो. कारण त्यांचे क्रेडिट कार्ड्स आणि डेटाबेस सहजपणे हॅक करता येतो. तसेच, या कंपन्या अवैध असल्याने ग्राहकांच्या डेटाचा गैरवापरही होऊ शकतो.

बॉस आयपीटीव्ही हा तशन आयपीटीव्ही, व्हॉइस आयपीटीव्ही, पंजाबी आयपीटीव्ही, इंडियन आयपीटीव्ही, ब्राम्पटन आयपीटीव्ही, बॉस एंटरटेनमेंट आणि गुरु आयपीटीव्ही यासारख्या पायरेट्स ग्रुपचा एक भाग आहे. ते एकच चॅट प्रोव्हायडर, होस्टिंग प्रोव्हायडर व आयपी अॅड्रेस वापरून जगभरात ब्रॉडकास्टर्सचे सिग्नल्स अवैधरित्या पुरवतात. ही कंपनी श्री हरप्रीत रंधवा या नावाने नोंदणीकृत असून या नावावर सर्व्हर सेंटर, चक दे टीव्ही, व्हॉइस, टिप्सी टाइम, तशन आयपीटीव्ही, 2144644 अलबर्टा लि आणि रिस्ले कोचर प्रा.लि.- रिस्ले प्रायव्हेट लिमिटेड हे नवे नाव, इत्यादी कंपन्याही नोंदवलेल्या आहेत.

नोंदवलेल्या तक्रारीनुसार, सायबर क्राइम पोलिसांनी रिस्ले इंडिया मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि रिस्ले इंडिया सेल्स ऑफिस, फरिदाबाद येथे धाड टाकली. मॅन्युफॅक्चरिंग युनिट येथे अवैध सेट टॉप बॉक्सच्या विक्रीसंबंधी ईमेल संवाद असलेली सिस्टिम आढळून आली तर, तळघर आणि ग्राऊंड फ्लोअरला 20 पेक्षा जास्त आसनी ऑफिस आढळले. उपरोक्त अवैध आयपीटीव्ही सेट टॉप बॉक्सच्या विक्री, सपोर्ट आणि एनओसीसाठी वापरले जात होते, हे ऑफिसमध्ये आढ‌ळ‌ले.

वरील दोन ठिकाणांहून 10 पेक्षा जास्त सिस्टिम्स (लॅपटॉप/डेस्कटॉप्स) फॉरेन्सिक तपासणीसाठी हस्तगत करण्यात आले. प्रमुख आरोपीसह सहाजण तसेच काही प्रमुख कर्मचाऱ्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून तपास अजून प्राथमिक स्तरावर असल्याने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. यानुसार, 10 मार्च 2021 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला. फरिदाबाद न्यायालयासमोर आरोपीने जामीन अर्ज दिला असून माननीय जज श्री किम्मी सिंगला यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला आहे.

हे सर्व विचारात घेता, माननीय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावले. 11 मार्च रोजी अटक झालेल्या 6 आरोपींची नावे सुमित शर्मा, हरमिंदर सिंग संधू, गणेश नायर, अनिल कुमार पाल, विरेंदर कुमार, देबोव्रत राय अशी आहेत.

पुढील तपासात असेही आढळून आले की, बॉस आयपीटीव्हीचे अवैध सेट टॉप बॉक्स डेटाकँपसारख्या विविध व्हेंडर्सद्वारे सीडीएन प्रोव्हायडर, गोडॅडी.कॉम, प्रॉक्झी, एलएलसी, ऑलस्ट्रीमकॉर्प, कॅनडा आणि इन्फोमिर.इयू साठी वापरला जात होता. या व्हेंडर्सकडील बॉस आयपीटीव्हीची लिंकदेखील तपासली गेली पाहिजे तसेच पायरसीला पाठबळ देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणी पायरेट्सचा जामीन कोर्टाने यापूर्वीच फेटाळणे, हे योग्य दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.


Back to top button
Don`t copy text!