स्थैर्य, फलटण : सुरवडी गावामध्ये डिसलरीच्या सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे या भागातील ओढ्यासह विहीर बोर पिण्यासाठी लागणारे पाणी दुषीत झाले आहे. हे पाणी योग्य ठिकाणी न सोडल्याने येथील नागरीकांच्या आरोग्यास धोका होण्याची चिंता निर्माण झाली आहे, तर पाळीव प्राणी यांना ही धोका निर्माण झाला आहे.
सुरवडी गावालगत डिसलरी प्लॅन्ट आहे. परंतु या डिसलरीचे सांडपाणी निरा नदीला पाणी आल्यानंतर व पाऊस चालू असताना कंपनी त्याचा गैरफायदा घेत सांडपाणी ओढ्यास सोडलं जातं आहे. तसेच त्यामुळे ते पाणी पिणार्या जनावरांना मासे इत्यादी मरण पावल्याचे सुद्धा दिसत आहे आणि पूर्ण पाणी दुषित करण्याचा प्रकार सुरू असल्याचेही येथील नागरीक बोलत आहेत. या ठिकाणच्या शेतकर्यांनी दरवर्षी सबंधीत विभागाला तक्रार करून या ठिकाणच्या विभागाचे अतर्गंत सबंधामुळे नागरीकांना या ठिकाणी न्याय मिळत नाही.
वारंवार सबंधीत विभागाकडे तक्रार करून देखील मनगटशाहीने पाणी सोडले जात आहे .याकडे सबंधीत अधिकारी लक्ष देईल का? असे येथील नागरीक बोलत आहेत. काही नागरीकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांना या घटनेची संपूर्ण माहीती दिल्यानंतर हे डिसलरीचे पाणी बंद केले नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.