
गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर राजुरी, आसू, राजाळे आणि शिंदेवाडी येथे ४ नव्या शाखा सुरू होत आहेत. गुरुवार, दि. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याला राजुरी शाखेचे उद्घाटन होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 18 मार्च : दर्जेदार शिक्षण आणि १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा जपणारे गुणवरे (ता. फलटण) येथील ‘ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ आता विस्ताराच्या उंबरठ्यावर आहे. सलग १२ वर्षांच्या यशस्वी आणि दिमाखदार वाटचालीनंतर, आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून संस्थेच्या तब्बल ४ नव्या शाखांचा शुभारंभ करण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती संस्थेच्या सचिव सौ. साधना संभाजी गावडे यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे.
या विस्तारीकरणाचा पहिला टप्पा म्हणून राजुरी (कुरवली पाटी), आसू, राजाळे (सर्व ता. फलटण) आणि शिंदेवाडी (ता. माळशिरस) येथे ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या शाखा सुरू होत आहेत. यापैकी राजुरी (कुरवली पाटी) येथील पंकज मेडिकल शेजारील नव्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या अत्यंत शुभमुहूर्तावर होणार आहे. गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
काय आहेत ‘ब्लू इंग्लिश मीडियम स्कूल’ची वैशिष्ट्ये?
फलटण तालुक्यात प्रथमच रोबोटिक्स एआय (Robotics AI Lab) आणि ब्रम्हांड लॅब (Universe Lab) ची अद्ययावत सुविधा देणारी ही CBSE मान्यताप्राप्त शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे विशेष भर दिला जातो.
-
शैक्षणिक गुणवत्ता: शाळेत नर्सरी ते बारावीपर्यंत ‘LEAD’ संचलित CBSE अभ्यासक्रम राबवला जातो. दरवर्षी इयत्ता १० वी आणि १२ वी चा १००% निकाल हे या शाळेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
-
स्पर्धा परीक्षा व पायाभूत तयारी: एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षा, स्कॉलरशिप, मंथन, नवोदय आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये शाळेचा १००% निकाल लागतो. तसेच विद्यार्थ्यांसाठी अबॅकस, वैदिक मॅथ्स आणि इयत्ता ११वी-१२वी साठी JEE व NEET ची विशेष तयारी करून घेतली जाते.
-
कौशल्य विकास: क्रियायुक्त आणि तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा प्रशिक्षण, नृत्य-संगीत आणि योगा प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष ठेवून मार्गदर्शन केले जाते.
-
अद्ययावत सुविधा: विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत संगणक कक्ष, रो-वॉटर फिल्टर (शुद्ध पाणी), संपूर्ण शाळा सी.सी.टी.व्ही. (CCTV) च्या सुरक्षित देखरेखीखाली आहे. तसेच संरक्षित भिंत, सुरक्षित स्कूल बस सुविधा आणि मोफत शिक्षण हक्क (RTE) सुविधा उपलब्ध आहे.
-
इतर उपक्रम: शाळेची सुसज्ज इमारत, भव्य खेळाचे मैदान, व्यायामशाळा, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. याशिवाय स्पर्धा परीक्षांची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लायब्ररी व मार्गदर्शन केंद्रही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, तंत्रज्ञान आणि संस्कार देणाऱ्या या ‘ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल’च्या राजुरी शाखेच्या उद्घाटन समारंभास परिसरातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर (तात्या) गावडे, प्राचार्य गिरिधर गावडे, उपप्राचार्या सौ. पूनम जाधव, मॅनेजर सौ. सोनाली मोरे आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

