ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरेचा दहावीचा १०० टक्के निकाल


दैनिक स्थैर्य | दि. २८ मे २०२४ | फलटण |
गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयातील मार्च २०२४ मध्ये झालेल्या एस. एस. सी. परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.

या परीक्षेत कु. श्रेयस रामदास खरात या विद्यार्थ्याने ८४.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कुमारी सिद्धी महादेव ठोंबरे हिने ७९.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कु. शिवम हनुमंत थोरात यांनी ७२.०० % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांना गिरीधर गावडे, शीतल फडतरे, पुनम जाधव, माधुरी बनकर, आशा धापटे, चक्रधर जाधव, राजेंद्र भोसले या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेत लीडच्या माध्यमातून दिले जाणारे गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण व विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे, श्री. संभाजीराव गावडे, प्राचार्य श्री. गिरीधर गावडे, उपप्राचार्या शीतल फडतरे, ऍडमिनिस्ट्रेटर रमेश सस्ते, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!