रक्तदानाचा उपक्रम सर्वांना दिशादर्शक: श्रीमंत संजीवराजे सासवड येथे रक्तदान शिबीराचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सासवड, दि. १८: रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ही संकल्पना ग्रामस्थांना समजावून देवून, सासवड येथे उत्तम प्रकारे आयोजित केलेले रक्तदान शिबीर व त्याला लाभलेला प्रतिसाद प्रेरणादायी असून समाजातील सर्व घटकांनी अशा शिबीरात सहभागी होऊन रक्तदान केले तर समाज आणि सर्वसामान्यांना दिशा देणारा हा उपक्रम ठरेल असा विश्‍वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

सातारा जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सारिका अनपट, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ. प्रतिभाताई धुमाळ यांच्या माध्यमातून फलटण मेडिकल फौंडेशन संचलित रक्तपेढीच्या सहकार्याने सासवड, ता. फलटण येथे आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन आ. दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.

सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान त्याबरोबरच अशा स्वरुपाचे, समाजाला दिशा व प्रेरणा देणारे कार्यक्रम घेतल्यास समाजातून निश्‍चित उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल असा विश्‍वास व्यक्त करुन या उपक्रमाबद्दल हिंगणगाव गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ आणि सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, ग्रामस्थ यांचे श्रीमंत संजीवराजे यांनी अभिनंदन केले.

प्रारंभी दत्ता अनपट यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पंतप्रधान, मुख्यमंत्री वगैरे सर्वांनी रक्तदान शिबीरे घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानुसार सदर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोरोना नियम, निकष विशेषतः योग्य सामाजिक अंतर, सॅनिटायझर व मास्क वापर आणि गर्दी टाळून हा उपक्रम यशस्वी करण्याची ग्वाही दिली.

या शिबीरात एकूण 132 जणांनी रक्तदान केले त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तथापी सुमारे 30/35 इच्छुक रक्तदात्यांना नुकतेच रक्तदान केले असल्याने तर महिलांना हिमोग्लोबीनचे रक्तातील प्रमाण कमी असल्याने रक्तदान करता आले नसल्याची नोंद घेऊन महिला, मुलींसाठी हिमोग्लोबीन तपासणी व रक्तवाढीसाठी आवश्यक गोळ्या उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीने नियोजन करण्याचे संकेत यावेळी दत्ता अनपट यांनी दिले.

गणेश तावरे यांनी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन केले. यावेळी हिंगणगावचे माजी सरपंच जयदीप ढमाळ,घाडगेवाडी सरपंच गणेश कदम, आदर्कीखुर्दचे सरपंच सौरभ निंबाळकर, पराग भोईटे इनामदार, रामराजे विचार मंचचे शुभम नलवडे, बाबुराव गावडे, दूध संघाचे संचालक मस्कु आबा अनपट, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव रासकर, गणेश पवार, गुलाबराव जगताप, विनायक अनपट, सासवडचे सरपंच राजेंद्र काकडे, उपसरपंच धर्मवीर अनपट, ग्रामपंचायत सदस्य सतीश अनपट, सासवड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, हनुमान तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!