
दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । फलटण । ‘‘रक्ताला कुठलाही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. कोवीडच्या महाभयंकर परिस्थितीत रक्तदानाच्या उपक्रमाला विशेष महत्त्व असून सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून होत असलेला रक्तदानाचा उपक्रम स्तुत्य आहे’’, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले.
सुरवडी (ता.फलटण) येथे स्वराज फाऊंडेशन, ग्रामपंचायत सुरवडी, युवाग्राम संस्था, सातारा व मुस्कान फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण शाखेचे अध्यक्ष प्रा.रमेश आढाव, युवाग्राम संस्था अध्यक्ष गणेश वाघमारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण नगरपालिकेचे गटनेते अशोकराव जाधव, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर. सुरवडी गावचे सरपंच जितेंद्र साळुंखे – पाटील, उपसरपंच दिपकराव साळुंखे – पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, बजरंग गावडे, अमोल सस्ते, ग्रामसेवक शिवाजी राऊत, नगरसेवक सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, सुनिल जाधव, सिराज शेख, राजेंद्र काकडे, वसंतराव ठोंबरे, शंकरराव दडस, सुधीर करळे, विक्रांत झणझणे, श्रीरंग पवार, सूर्यकांत निंबाळकर, बाळासाहेब जगताप, संदिप सगरे, युवराज पवार, शक्ती भोसले, विशाल नलवडे, किरण जाधव, अलंकार भोईटे, वैभव झणझणे, सुकुमार राणे, आबा शिंदे, सुनील कळसकर, त्रिम्बक डोंबाळे, सतीश वावरे, विकास लोखंडे, शिवाजीराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन अमित रणवरे व वसीम इनामदार यांनी केले. आभार शिवानी पावटे यांनी मानले.
शिबिरात रकदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला एक झाड, एक पुस्तक व विविध संस्थांची प्रमाणपत्र देण्यात आली व स्वराज फाउंडेशन तर्फे कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.