दैनिक स्थैर्य | दि. १७ मार्च २०२४ | फलटण |
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानाने अनेक जीवांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान ही काळाची गरज आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून संगिनि फोरम व फलटण आगाराने रक्तदान शिबिराचे केलेले आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन प्रा. शिवलाल गावडे सर यांनी केले.
रक्तदानाचे महत्त्व व गरज लक्षात घेऊन संगिनी फोरम, फलटण व फलटण एस. टी. आगार यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण ब्लड बँकेच्या सहकार्याने फलटण बसस्थानकावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रा. गावडे सर बोलत होते.
या रक्तदान शिबिरास फलटण आगारातील चालक-वाहक कर्मचारी, अधिकारी यांनी ऊस्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले.
यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, संगिनि फोरम अध्यक्षा अपर्णा जैन, स्थानकप्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, वाहतूक निरीक्षक रविंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत करवा, संचालक डॉ. ऋषिकेश राजवैद्य, संगिनि खजिनदार मनिषा घडिया, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, माऊली कदम, संगीनि फोरमच्या माजी अध्यक्षा नीना कोठारी, सदस्या ममता शहा, नेहा दोशी तसेच बहुसंख्य एस. टी. कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. संगिनी सदस्या ममता शहा यांनी रक्तदानाचे महत्व, एस. टी. कर्मचारी बंधूंचे समाजातील योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संगिनि फोरमकडून सर्व रक्तदाते व ब्लड बँक कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले.