मोहनराव नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । फलटण । निंबळक (ता.फलटण) येथील ज्येष्ठ नेते मोहनराव नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्‍वर नागरी सहकारी पतसंस्था व राजेगट निंबळक यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. सदर शिबीराचे उद्घाटन फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर रक्तदान शिबीरात 72 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन वामनराव यादव, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिंदे, निंबळक नं.2 विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दादासोा कापसे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, प्रगतशील बागायतदार लालासाहेब निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य सुजीत रणवरे, अमीर गायकवाड, सौ.वंदना कापसे, सौ.संगीता भोसले, माजी उपसरपंच रविंद्र भोसले, पत्रकार लखन नाळे, गुणवरे गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव लंगुटे, निंबळकचे युवा नेते मेघराज नाईक निंबाळकर, शंभुराज नाईक निंबाळकर, उदय कापसे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले, आभार देवानंद कापसे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!