भगवान महावीर जन्म कल्याण दिनानिमित्त फलटणमध्ये रक्तदान शिबिर, चारा वाटप, पाणपोईचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२४ | फलटण |
भगवान महावीर जन्म कल्याण दिनानिमित्त फलटणमध्ये ‘ब्लड डोनेशन कॅम्प’ व कीर्ती स्तंभ येथे सरबत वाटप, चारा वाटप व पक्ष्यांसाठी धान्य, पाणी पॉट वाटप पाणपोई उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला आहे.

रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी भगवान महावीर जन्म कल्याण दिनानिमित्त (२६२३ व्या) जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने फलटण मेडिकल फाउंडेशन, ब्लड बँक फलटण यांच्या सहकार्याने जैन सोशल ग्रुपने सकाळी ९ ते १ या वेळात सहस्त्रकुठ जैन धर्मशाळा, दगडी पुलाजवळ, फलटण येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

शिबिरात सामील होणार्‍या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच जैन सोशल ग्रुपतर्फे भगवान महावीर कीर्तीस्तंभ येथे सरबत वाटप करण्यात येणार आहे. जैन सोशल ग्रुपच्या वतीने फलटण शहरातील बेवारस जनावरांना चारा वाटपाबरोबरच पक्ष्यांसाठी धान्य, पाणी पॉट वाटप करण्यात येणार आहे. तसेच संगिनी फोरम फलटणकडून उमाजी नाईक चौक येथे पाणपोई सुरू करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदान करावे, असे आवाहन जैन सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!