उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मलटण येथे रक्तदान शिबिर व साडीवाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२४ | फलटण |
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर संघटक अक्षय तावरे आणि मंगेश खंदारे यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी श्री हरिबुवा मंदिर, मलटण येथे केले होते. तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ. कल्पनाताई गिड्डे आणि फलटण शहर संघटिका श्रीमती लता तावरे यांच्याकडून गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.

प्रारंभी शिवसेना फलटण तालुकाप्रमुख विकास नाळे तसेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष (शरदजी पवार पक्ष) सौ. प्रतिभाताई चेतन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शिवआरोग्य सेना जिल्हा सचिव शैलेंद्र नलवडे, तालुका संघटक नंदकुमार काकडे, महेंद्र घाडगे, मच्छिंद्र नाना भोसले, कुमार भोसले, आम आदमी पक्षाचे वीरसेन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते महेश कुमार खरात यांची कार्यक्रमास उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!