
स्थैर्य, मुंबई, दि.१२: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठी समाजाने केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. ‘एमपीएससीच्या परीक्षांवर तोडगा काढता आला असता, पण परीक्षा रद्द करताना सरकारने फक्त एकाच जातीचा विचार केला आहे. बाकी 85 टक्के जनतेचे काय?’ असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला.
प्रकास आंबेडकर म्हणाले की, ‘एका जातीचे राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवतो, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपले चारित्र बघावे आणि नंतर टीका करावी. मराठा आंदोलकांना सरकारने विश्वासात घेतले नाही. महाविकासआघाडीचे सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशची अंमलबजावणी करत नाही’, असेही आंबेडकर म्हणाले.