
स्थैर्य, कराड, दि. १ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापारी एकवटले आहेत.त्यांनी स्वयंस्फूर्तीने दोन ते आठ सप्टेंबरअखेर सर्व दुकानांसह त्यांचे व्यवहार बंद ठेवून कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. मात्र, अन्य कोणत्याही दुकानांचे व्यवहार चालू न ठेवण्याचे आवाहन सर्व व्यापारी संघटनांनी केले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास हातभार लागणार आहे.
काही दिवसांपासून शहरात कोरोनचा पर्दुर्भाव वाढत आहे. त्यात प्रामुख्याने व्यापारी, सामान्य नागरिकांचे मृत्यू होत आहेत. त्या सर्व स्थितीमुळे जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवला आहे. व्यापारी, सामान्य नागरिक व प्रशासकीय पातळीवर महामारी आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. मात्र ते अपुरे पडत आहेत, असे सर्वांचेच मत झाले आहे. त्यामुळे संवेदनशीलपणे कोरोनाची स्थिती पाहून जीव वाचवणे व मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी एकत्र आले आहेत.