जिल्ह्यातील शाळांत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ; सुरक्षिततेचे नियम पाळल्याचा परिणाम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 


स्थैर्य, सातारा, दि.६ : जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा व
महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील 713 शाळा सुरू
होऊन 28 हजार 699 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, कोरोनाच्या
पार्श्‍वभूमीवर शाळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम व अटींचे पालन
केल्याने सद्य:स्थितीत 737 शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांच्याही
संख्येत वाढ होऊन ती 33 हजार 812 एवढी झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद
ठेवण्यात आली होती. मात्र, 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश
आल्यानंतर शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शक सूचना फलक, वर्गखोल्या व विविध
विभागांचे सॅनिटायझेशन, स्वच्छता केली होती. सुरवातीला विद्यार्थ्यांची
उपस्थिती तुरळक दिसत होती. मात्र, सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांच्या संख्येत
काही प्रमाणात वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर
विद्यार्थ्यांची उपस्थिती 19 टक्के होती. सध्या 22 टक्के झाली आहे.
प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येताना प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल
स्क्रिन, सॅनिटायझर, मास्क घालूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून,
वर्गांमध्ये एक बेंच सोडून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केल्याने
विद्यार्थीसंख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, नववी ते बारावीपर्यंत
विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाही कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात
आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 80 शिक्षक बाधित आढळले असून, शिक्षकेतर
कर्मचारी 34 आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे असलेले 46 शिक्षक आढळले आहेत.

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. मात्र,
कोरोनाच्या प्रादुर्भावात शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या
सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्याने विद्यार्थीसंख्येत वाढ झाली आहे.
यामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती व 100 टक्के शाळा पाटण
तालुक्‍यात सुरू झालेल्या आहेत. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!